कॅमेरा. .क्लिक. . .फोटो. . .Relive Your Travel Moments

by

 Posted on Wed Aug, 19 2015 18:51

Photography Contest

 

        कॅमेरा. . . .फोटो. . .क्लिक. . .हे शब्द कानावर पडताच गतकाळातील अनेक सार्या आठवणी डोळ्यासमोरून तरंगु लागतात. गोड आठवणीचा मेळ आणि त्या पुन्हा पुन्हा बघता याव्यात यासाठी काढले जाणारे फोटोस. . .परंतु ते काढण्यासाठी छायाचित्रकारांची आवश्यकता असतेच, असे नाही ना! सुंदरसा क्षण . . .काढला मोबाएल अथवा कॅमेरा . .कि टिपला जातो एक सुंदर क्षणातला 'फोटो'. आज "World Photography Day" . . च्या निमित्ताने घेतलेला छोटासा आढावा. .

        जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा , गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा , अन संघर्षाचा ... अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात . अशा ह्या अनुभवानेच आपण शिकतो , घडतो . अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. तुमच्या आयुष्यातले असेच काही क्षण तुम्ही आता आमच्यासमोर मांडू शकता . जे तुम्ही अनुभवलेत ! तुमच्या शब्दात ..तुमचे जीवनानुभव ..!!

        मग कधी कधी आपल्यास आठवतात हरविलेल्या वाटा . . खरतर या जोडलेल्या असतातच एकमेकांशी कुठेतरी . . .गरज असते एकमेकांना जोडलेलं असण्याची . . . .मग यातच आठवत जातात साऱ्या पहिल्या आठवणी .   . पहिलं प्रेम, पहिली भेट, पहिला पाऊस, पहिलं सार काही मग. . .त्याचा चांगला वाईट अनुभव आला तरी ते निरअतिशय सुंदर असते. तर कधी गर्द हिरवाईतील सुखद क्षण . . तर कधी उंच टेकडीवर घालवलेली सांजवेळ. . अशाच खूप साऱ्या आठवणीच्या चांगल्या-वाईट प्रसंगांनी भरलेलं आभाळ प्रत्येकांच्या आयुष्यात असतच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

असाच तुमच्या आयुष्यातील सुवर्णक्षण तुम्ही आमच्या सोबत share करू शकता.

आमचा ई मेल आहे - feedback @godisha.in

अथवा  whats app - 7045645844